डॉ. दिपक सोमवंशी यांच्या प्रचाराचा निडेबन येथे शुभारंभ
January 22, 2026
उदगीर / प्रतिनिधी :
उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे अधिकृत उमेदवार डॉ. दिपक संग्राम सोमवंशी यांनी आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आज जन्मगाव निडेबन येथे केला. माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निडेबन येथील हनुमान मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला.या वेळी डॉ. दिपक सोमवंशी यांनी ग्रामदैवताचे दर्शन घेत जनतेच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. “निडेबन गटातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास, पाणी, रस्ते, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल,” असे त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना स्पष्ट केले.या प्रचार शुभारंभ प्रसंगी निडेबनचे माजी सरपंच सुनील सोमवंशी, ग्रामपंचायत सदस्य संदीप अनंतवाळ, दशरथ शिंदे, शशिकांत सोमवंशी, मारुती सोमवंशी, श्रीरंग वाघमारे, गौतम सोमवंशी, धम्म सागर सोमवंशी, मनोज कपाळे, जोगेंद्र सोमवंशी, शिवराज अनंतवाळ, भीम सोमवंशी, शेखर आनंदवाळ, आशिष सोमवंशी, अभिनव वानखेडे, खंडू सोमवंशी, गणेश कांबळे, नरसिंग सोमवंशी, रामदास सूर्यवंशी, महादेव हरणे, बाबू चंद्रकांत आनंदवाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी यावेळी एकजुटीचा निर्धार व्यक्त करत सूरू आसलेल्या निवडणुकीत डॉ. दिपक सोमवंशी यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा विश्वास व्यक्त केला. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे निडेबन जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे वातावरण तापले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Social Plugin