Type Here to Get Search Results !

निडेबण गटातील मल्लापुरात काँग्रेसचे उमेदवार रंजीत पाटील यांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद

उदगीर प्रतिनिधी
निडेबण जिल्हा परिषद गटातील मल्लापुर गावात काँग्रेस पक्षाचे उमेदवार रंजीत पाटील यांच्या प्रचाराला स्थानिक मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. प्रचार फेरीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, थेट संवाद आणि प्रश्नांची सरबत्ती यामुळे ही निवडणूक केवळ औपचारिक न राहता जनतेच्या प्रश्नांभोवती फिरताना दिसत आहे.मल्लापुरसह परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, रोजगार, आरोग्य व शिक्षणाच्या प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर रंजीत पाटील यांनी प्रचारादरम्यान थेट लोकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. “निवडणूक आली की दिसणारे नेते नकोत, तर कायम लोकांमध्ये राहणारे प्रतिनिधी हवेत,” अशी भावना अनेक मतदारांनी व्यक्त केली.
रंजीत पाटील हे सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ सक्रिय असून गरजू, गोरगरीब व दुर्लक्षित घटकांसाठी मदतीचा हात देणारा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. आजारपण, अपघात, शासकीय कामांतील अडथळे किंवा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी ते वेळेवर धावून जातात, असा अनुभव अनेक नागरिकांनी सांगितला. त्यामुळे केवळ पक्षनिष्ठेपेक्षा कामाची विश्वासार्हता मतदारांसाठी अधिक महत्त्वाची ठरत असल्याचे दिसते.प्रचारादरम्यान तरुण, महिला आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. “गटात बदल हवा आहे आणि तो बदल काम करणाऱ्या उमेदवारातूनच होऊ शकतो,” अशी प्रतिक्रिया युवकांनी दिली. महिलांनीही पाणी, आरोग्य व स्वयंरोजगाराच्या प्रश्नांवर ठोस भूमिका अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले.एकीकडे निवडणूक रणधुमाळी वाढत असताना, मल्लापुरातील चित्र मात्र स्पष्ट संकेत देत आहे. केवळ घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष कामाचा हिशोब मतदार तपासत आहेत. या पार्श्वभूमीवर रंजीत पाटील यांना मिळणारा वाढता प्रतिसाद आगामी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.