Type Here to Get Search Results !

राज्यातील कोरोना रुग्णांची प्रकृती स्थिर, नागरिकांनी घाबरु नये, जनजागृतीसाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घ्याव्यात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  मुबई / प्रतिनीधी

राज्यातील कोरोना रुग्णांची प्रकृती स्थिर, नागरिकांनी घाबरु नये, जनजागृतीसाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घ्याव्यात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 


मुबई / प्रतिनीधी


महाराष्ट्राचे मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यानी राज्यामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विभागासह विमानतळ, बंदरे, रेल्वे येथेही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी सामुहीक कार्यक्रमांना गर्दी करणे टाळावे. शाळा, महाविद्यालये तसेच धार्मिक कार्यक्रम यांचेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात घेतानाच खासगी रुग्णालयातील विशेषज्ञांनी यासंदर्भात सर्वसामान्यरित्या अवलंबवायची कार्यपद्धती (एसओपी) तातडीने तयार करावी. जनजागृती करण्यासाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.