Type Here to Get Search Results !

उदगीर जिल्हा परिषद निवडणूक : भाजप नेत्यांकडून काँग्रेस उमेदवाराचा प्रचार; पक्षश्रेष्ठींसमोर शिस्तीचा प्रश्न?


उदगीर / प्रतिनिधी :
उदगीर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत अनपेक्षित राजकीय घडामोडीने स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी उघडपणे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याची चर्चा रंगली आहे. अधिकृत युतीच्या पार्श्वभूमीवर ही भूमिका पक्षनिष्ठेला धक्का देणारी मानली जात असून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे.तालुक्यातील काही सभांमध्ये या नेत्यांनी काँग्रेस उमेदवारासोबत गावभेटी करत. तसेच मतदारसंघात मतदाराच्या भेटी घेत काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड विजय करा आसे मनात थेट पाठिंबा दर्शवल्याचे सांगितले जाते. स्थानिक पातळीवर यामुळे भाजपच्या संघटनात्मक एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. युतीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अशी भूमिका घेणे हा शिस्तभंगाचा प्रकार ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.भाजपच्या संघटनात्मक नियमांनुसार, पक्षविरोधी कारवायांवर कारणे दाखवा नोटीस, स्पष्टीकरण मागवणे आणि गरज पडल्यास निलंबन किंवा हकालपट्टीपर्यंतची प्रक्रिया राबवली जाऊ शकते. जिल्हाध्यक्षांने या प्रकरणातत लक्ष घालून या प्रकरणाची माहिती  प्रदेश नेतृत्वाकडे करावी आहे अशी मागणी पक्षातील पदाधिकारी करीत आहेत.अंतिम निर्णय राज्य पातळीवरील नेतृत्वाने घेवून  कारवाही केली पाहिजे दरम्यान, काँग्रेसकडून या घडामोडीचे स्वागत करण्यात येत असले तरी भाजपसाठी ही प्रतिमा आणि संघटनशक्तीची कसोटी ठरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये गटबाजी आणि वैयक्तिक समीकरणे पक्षनिष्ठेपेक्षा प्रभावी ठरत असल्याचे चित्र पुन्हा स्पष्ट झाले आहे.याउलट, राज्याचे माजी मंत्री आमदार  संजय बनसोडे  यांनी मात्र युती धर्माचे काटेकोर पालन करत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत युतीच्या उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी व्यापक दौरे आणि बैठका घेतल्या. ‘पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे’ तालुक्यातील विविध भागांत संपर्क साधत त्यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय केले,  त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक ठिकाणी युतीचे उमेदवार निवडून आले  आहे.आता भाजप नेतृत्व या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ही घडामोड आगामी स्थानिक राजकीय समीकरणांवर परिणाम करणार का, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.