Type Here to Get Search Results !

उदगीरात गॅस वितरकांचा मनमानी कारभार; सर्वसामान्य नागरिक वेठीस.!


​गॅसची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची चर्चा; प्रशासनाचे दुर्लक्ष
उदगीर प्रतिनिधी 
​उदगीर शहरासह ग्रामीण भागात गॅस सिलिंडरच्या वितरणावरून नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे. येथील 'उदयगिरी गॅस एजन्सी'च्या व मनोज गॅस एजन्सी ढिसाळ नियोजनामुळे आणि मनमानी कारभारामुळे ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे वेळेवर बुकिंग होत नाही, तर दुसरीकडे बुकिंग होऊनही १५-१५ दिवस गॅस मिळत नसल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.​मुख्य समस्या आणि तक्रारी:काळा बाजार: एजन्सीकडून गॅस सिलिंडरची चढ्या दराने काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. हक्काचा गॅस मिळवण्यासाठी सर्वसामान्य रांगेत उभे असताना, दुसरीकडे मात्र अवैध विक्री होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.वितरणात विलंब: गॅस बुकिंग केल्यानंतर नियमानुसार दोन ते तीन दिवसांत वितरण होणे अपेक्षित असताना, ग्राहकांना १० ते १५ दिवस वाट पाहावी लागत आहे.प्रशासनाचे दुर्लक्ष: गॅस एजन्सीच्या या मनमानी कारभाराकडे संबंधित पुरवठा विभाग आणि प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. यामुळेच एजन्सी मालकांचे धाडस वाढत चालल्याचा आरोप नागरिक करत आहेत.नागरिकांची मागणी:या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन प्रशासनाने उदयगिरी गॅस एजन्सी व मनोज गॅस एजन्सी च्या कारभाराची सखोल चौकशी करावी. ज्या ग्राहकांनी बुकिंग केले आहे, त्यांना तात्काळ गॅस उपलब्ध करून देण्यात यावा आणि काळ्या बाजारात सिलिंडर विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहे.