Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. दीपक सोमवंशी यांनी केले अभिवादन

उदगीर/ प्रतिनिधी : 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उदगीर शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने नूतन जिल्हा परिषद सदस्य डॉ. दीपक सोमवंशी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा महामानवाचा संदेश आजही समाजाला प्रेरणा देणारा असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. ​जयंती उत्सवाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत, सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. ज्योती दीपक सोमवंशी यांच्या पुढाकाराने आणि 'माता रमाई मैत्री ग्रुप'च्या वतीने विशेष उपक्रम राबवण्यात आला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात या ग्रुपच्या वतीने 'खिचडी' वाटप करून अन्नदान करण्यात आले. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. ​अन्नदानाच्या या कार्यक्रमाप्रसंगी नूतन जिल्हा परिषद सदस्य डॉ. दीपक सोमवंशी यांच्यासह उषाताई कांबळे, सौ. धसवाडीकर, सौ. आशा शिंदे, डॉ. उषा काळे, सौ. पुष्पा मसके, सौ. बुलबुल मॅडम, सौ. मिनाक्षी बलांडे आणि डॉ. ज्योत्सना माने यांची प्रमुख उपस्थिती होती.​यावेळी बोलताना डॉ. ज्योती सोमवंशी म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर दीन-दलितांच्या आणि शोषितांच्या उत्थानासाठी कार्य केले. त्यांच्या जयंतीनिमित्त गोरगरीब जनतेची सेवा करणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल. माता रमाई मैत्री ग्रुपच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन राबवलेला हा अन्नदानाचा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.
​या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक महिला भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीच्या निमित्ताने उदगीर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले, तसेच ठिकठिकाणी निळे झेंडे आणि विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सामाजिक उपक्रमाचे शहरभर स्वागत होत आहे.