Type Here to Get Search Results !

​डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी ‘शिवा संघटना’; उदगीरात जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन


​उदगीर (प्रतिनिधी):
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज १४ एप्रिल रोजी शिवा संघटनेच्या उदगीर शाखेच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संघटनेच्या वतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
​या अभिवादन कार्यक्रमास शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे, जिल्हाध्यक्ष ॲड. विलास खिंडे, तालुका अध्यक्ष रामेश्वर कदम, शहराध्यक्ष डॉ. रवी मुळे, निवृत्त पोलीस अधिकारी तपसाळे साहेब, राजेश शेटकर, गजानन राजुरे, प्रशांत ममदापूर आणि उदगीर शहर संपर्कप्रमुख अमित आठाने यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.​यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे म्हणाले की, "शिवा संघटना ही कायमच तळागाळातील समाजासाठी कार्य करणारी संघटना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या आणि न्यायाच्या विचारांचा वारसा चालवणे, हेच आमच्या संघटनेचे ध्येय आहे."जिल्हाध्यक्ष ॲड. विलास खिंडे यांनी उपस्थित सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात ते म्हणाले, "महात्मा बसवेश्वर महाराजांचे समतेचे विचार जर खऱ्या अर्थाने कोणी पुढे नेले असतील, तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच. त्यांच्या कार्यामुळेच देशाला एक प्रबळ लोकशाही मिळाली आहे."दरम्यान, उदगीर शहर जयंती महोत्सव समितीने उभारलेल्या भव्य स्मारकाच्या सजावटीचेही यावेळी कौतुक करण्यात आले. शहरात आज दिसणारे उत्साहाचे आणि प्रेरणेचे वातावरण नागरिकांना भारावून टाकणारे होते.