तरुणाईच्या जणसागरात अश्वावरून मिरवणूक आणि पुष्पवृष्टीने आतिषबाजी करून जंगी स्वागत
होमपीचवर लोकप्रिय जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांचा हृद्य सत्कार
विकासाचा पहिला घास अन झुकते माप देणार-राहुल केंद्रे
उदगीर (प्रतिनिधी)
लोहारा गटातून निवडून आलेले जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांचा लोहारा ग्रामस्थांच्या वतीने हृद्य सत्कार करण्यात आला.तासभर चाललेल्या मिरवणुकीत अश्वावर बसवून ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करीत ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या नेतृत्वाच्या निवडीचा आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रमाकांत मोमले होते.प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे सभापती बापूसाहेब राठोड,पं.स.चे माजी उपसभापती रामदास बेंबडे, पं.स,सदस्य सुभाष कांबळे,बालाजी गवारे, शहर अध्यक्ष उदयसिंह ठाकूर, हणमंतराव हंडरगुळे,सभापती गणेश गायकवाड,सतीश राचूटे,उद्धव गंभीरे,भागवत गुरमे,,दिलीप पाटील,उपरपंच दयानंद सोनटक्के,त्र्यंबक बिरादार,चेअरमन शेषराव हेळगे आदी उपस्थित होते.
प्रारंभी ग्रामस्थांच्या वतीने जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.मोहन पाटील यांनी प्रास्तविक केले.
"जन्मापासून अंत्यसंस्कारापर्यंत देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या योजना असून ,या जिल्हा परिषद गटाने निवडून दिल्याने अध्यक्षपदाची संधी मिळाली,त्यामुळे विकासाचा पहिला घास व झुकते माप लोहा-यासाठी राहील अशी ग्वाही जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी यावेळी बोलताना दिली.
"लोहारा येथील ग्रामस्थांचा एकोपा व भाईचारा आदर्श घेण्याजोगा आहे .गाव मोठा असला तरी विकासासाठी एकत्रित येण्याचा सगुण आदर्श आहे" असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले पद मिळाले म्हणून उतणार नाही मतनार नाही घेतलेला जनसेवेचा वसा आयुष्य भर सोडणार नाही पद असो नसो जनसेवा करत राहणार तुळशीदास बिरादार यांनी सुत्रसंचालन तर पद्माकर बिरादार यांनी आभार मानले.
*राज्याचा लालदिवा खुणावतोय*
"लोहारा गटातून जि.प.सदस्य म्हणून निवडलेले गोविंदअण्णा केंद्रे पुढे आमदार झाले,राहुलभैय्या पुढे नामदार होतील" असा विश्वास जि.प.चे माजी सभापती बापूराव राठोड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
राहुल केंद्रे यांचे आगमन होताच फटाक्यांची प्रचंड आतिशबाजी करण्यात आली.
गावातील सर्व मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.सर्व महात्म्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.पुष्पवृष्टी करण्यात आली.महिलांनी ठिकठिकाणी औक्षवण करून त्यांचे स्वागत केले.

Social Plugin