Type Here to Get Search Results !

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त उदगीर नगर परिषदेत रक्तदान शिबिर संपन्न; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


उदगीर प्रतिनिधी
उदगीर येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उदगीर नगर परिषद परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधीलकी जपण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.महात्मा बसवेश्वर महाराजांनी 'कायकवे कैलास' (श्रम हाच स्वर्ग) आणि मानवतेचा संदेश दिला. याच विचारांचा वारसा पुढे नेत, रक्ताची गरज लक्षात घेऊन हे शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या सुरुवातीला महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.या रक्तदान शिबिरात पत्रकार मंगेश सूर्यवंशी यांच्यासह आशिष अंबरखाने, ओम गांजुरे, अंकेश धनुरे, शैलेश कस्तुरे, राजू मोगले, अजय शेटकार, राजू चौधरी, प्रमोद हुडगे, महेश तोडकर, तेजस आंबेसंगे व इतर अनेक मान्यवरांनी आणि युवकांनी रक्तदान केले.
 स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. जयंतीच्या निमित्ताने केवळ मिरवणूक किंवा उत्सव न साजरा करता, एका रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी केलेले हे रक्तदान समाजासाठी आदर्श ठरणारे आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शहरातील तरुण व सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.