Type Here to Get Search Results !

श्रीकांत पाटील व सिध्देश्वर पटणे यांच्या वतीने शानीटायझर व मास्कचे वाटप*

श्रीकांत पाटील व सिध्देश्वर पटणे यांच्या वतीने शानीटायझर व मास्कचे वाटप



उदगीर / प्रतिनिधी


 


            सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीने हतबल झाले आहे. कोरोनामुळे आपल्या देशात लॉकडाऊन चालू आहे सर्व जनता घरी बसून प्रशासनाला सहकार्य करत आहे. हे करत असताना प्रशासनातील अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, डॉक्टर, नर्स, स्वछता कर्मचारी इत्यादी जनतेच्या सेवेसाठी व सुरक्षेसाठी आपला जीव धोक्यात घालून सदैव आपले कर्तव्य चोखपने बजावत आहेत. त्याबद्दल सामाजिक बांधिलकेची जाण ठेवून विकास नगर येथील श्री क्षेत्र महादेव मंदिरचे अध्यक्ष श्रीकांत पाटील व इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.सिध्देश्वर पटणे यांच्या वतीने उदगीर शहर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांसाठी शानीटायझर व मास्क पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी पी.एस.आय गजानन पाटील, पी.एस.आय. खेडकर साहेब, पी.एस.आय. एडके साहेब, राजकुमार घोरपडे इत्यादी उपस्थित होते.सर्वांना विनंती की, स्वतःची काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा, घरी रहा सुरक्षित रहा.