Type Here to Get Search Results !

तोंडचिर येथे युतीच्या प्रचारासाठी गाठीभेटी रॅली; नागरिकांचा प्रतिसाद


उदगीर प्रतिनिधी
निडेबन जिल्हा परिषद गटातील तोंडचिर गावात युतीच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार डॉ. दीपक संग्राम सोमवंशी आणि पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार सुनिता प्रकाश राठोड यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीला गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.रॅलीदरम्यान उमेदवारांनी गावोगावी फिरून नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. विकासकामे, पाणीप्रश्न, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकासा संदर्भातील मुद्द्यांवर नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. “गावाचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा आहे. शब्द नव्हे तर काम करून दाखवण्यावर आमचा विश्वास आहे,” असे डॉ. दीपक सोमवंशी यांनी यावेळी सांगितले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन पाटील, राजपाल टांगातूरे, राम जाधव, सुनिल  राठोड, देवदास राठोड  सरपंच आकाश नरवाड  निडेबनचे माजी सरपंच सुनील सोमवंशी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संदीप अनंतवाळ, दशरथ शिंदे, शशिकांत सोमवंशी, मारुती सोमवंशी, श्रीरंग वाघमारे, गौतम सोमवंशी, धम्मसागर सोमवंशी, मनोज कपाळे, जोगेंद्र सोमवंशी, शिवराज अनंतवाळ, भीम सोमवंशी, शेखर आनंदवाळ, आशिष सोमवंशी, अभिनव वानखेडे, खंडू सोमवंशी, गणेश कांबळे, नरसिंग सोमवंशी, रामदास सूर्यवंशी, महादेव हरणे, बाबू चंद्रकांत आनंदवाळ आदींची उपस्थिती होती.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अविनाश गायकवाड, प्रेम गायकवाड, पकोळे शिवा यांचीही उपस्थिती लाभली. रॅलीमुळे तोडचिर परिसरात राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकीत युतीची ताकद स्पष्ट पणे दिसून येत आहे.