उदगीर / प्रतिनिधी
उदगीर येथील जीवन विकास निवासी मतिमंद कर्मशाळेत २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य डॉ. दिपक सोमवंशी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर कर्मशाळेतील सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांची सविस्तर आरोग्य तपासणीही करण्यात आली.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राहुल गायकवाड, शंकर बोईनवाड, मंगेश सूर्यवंशी, डॉ. अस्मिता पाटील (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र नळगीर), डॉ. शेख सफूरा (सीएचओ, कौळखेड), गायकवाड अमोल, सोमवंशी मॅडम, मधुकर दिगंबर पाटील (माजी सरपंच, लिमगाव) यांची प्रमुख उपस्थिती होती.आरोग्य तपासणी शिबिरात विद्यार्थ्यांची सर्वसाधारण शारीरिक तपासणी, वजन, उंची, रक्तदाब आदींची नोंद करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन आवश्यक त्या वैद्यकीय सूचना देण्यात आल्या. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.यावेळी मतिमंद कर्मशाळेचे अधीक्षक राजापटेल अब्दुल मलिक, भंडारवार ईरवंत, संग्राम एसमोडे, सय्यद साजिद, शेख हिलाल, जागीरदार बि.के, देविदास चव्हाण, कोणमारे आनंद, विलास चव्हाण आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कारासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीमुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव अधोरेखित झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Social Plugin