Type Here to Get Search Results !

उदगीरमध्ये शिवगर्जना ! अवैध धंदे आणि प्रलंबित रस्त्यासाठीस्वप्निल (अण्णा) जाधवांचे थेट प्रशासनाला साकडे


उदगीर / प्रतिनिधी 
उदगीरजळकोट विधानसभा मतदारसंघातील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षाचे विधानसभा प्रमुख स्वप्निल
(अण्णा) अनिल जाधव यांनी वाढवणा
(बु) परिसरातील आणि संपूर्ण उदगीर
तालुक्यातील ज्वलंत प्रश्नांवर आक्रमक
पवित्रा घेतला आहे. वाढवणा (बु)
परिसरातील अवैध धंद्यांचा नायनाट
करणे, संपूर्ण उदगीर शहर व तालुक्यातील
अवैध धंद्यांवर लगाम लावणे आणि
मातंग समाजाच्या स्मशानभूमीचा रस्ता
मार्गी लावणे, या मागण्यांसाठी त्यांनी
तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला
धडक दिली आहे. १. वाढवणा (बु) मधील अवैध
धंद्यांना कायमस्वरूपी टाळे लावा!
स्वप्निल जाधव यांनी तहसीलदार
राम बोरगावकर साहेब यांना दिलेल्या
निवेदनात वाढवणा (बु) परिसरातील
ढासळत्या सामाजिक स्थितीवर चिंता
व्यक्त केली आहे * तरुणांचे भवितव्य धोक्यात
परिसरात दारू आणि मटक्याचा सुळसुळाट
झाला असून, यामुळे सुशिक्षित तरुण पिढी
आणि शाळकरी विद्यार्थी चुकीच्या मार्गाला
लागत आहेत.* शाळा-कॉलेज परिसरात दहशत
शाळा आणि कॉलेजच्या परिसरात मटका
बहादूर आणि अवैध दारूवाल्यांचा धंदा
जोमाने सुरू आहे, ज्यामुळे नागरिक त्रस्त
आहेत.* मागणी: प्रशासनाने या अर्जाची
तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी
करावी आणि हे सर्व अवैध धंदे
कायमस्वरूपी बंद करावेत.२. उदगीर शहर व तालुक्यात'खाकी'चा धाक कुठे?केवळ वाढवणाच नव्हे, तर संपूर्णउदगीर शहर व तालुक्यातील अवैध धंद्यांविरुद्ध त्यांनी २० फेब्रुवारी २०२६रोजी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला आहे.
* सामाजिक वातावरण बिघडले
मोठ्या प्रमाणावरील अवैध दारू आणि
मटका यामुळे सार्वजनिक वातावरण दूषित
होत असल्याचा आरोप त्यांनी केला
आहे.* पोलिसांना साकडे परिसरातील
कायदा-सुव्यवस्था कुठे आहे? असा
सवाल नागरिकांना पडला असून,
पोलिसांनी तात्काळ चौकशी करून हे
धंदे बंद करावेत, अशी नम्र विनंती त्यांनी
अर्जाद्वारे केली आहे.३. मातंग समाज स्मशानभूमी रस्ता प्रशासनाला 'अल्टीमेटम'
१७ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या
दुसऱ्या निवेदनात त्यांनी वाढवणा (बु)
येथील मातंग समाजाच्या अनेक वर्षांपासून
प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीच्या
रस्त्याचा प्रश्न मांडला. * मरणयातनाः रस्ता नसल्यामुळे अंत्यविधीसाठी प्रेत घेऊन जाताना
समाजबांधवांना मोठी गैरसोय सहन
करावी लागत आहे. * तीव्र आंदोलनाचा इशारा
पुढील एक महिन्याच्या आत या
रस्त्याच्या कामाला मंजुरी द्यावी, असा
विश्र्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जर
महिनाभरात हा प्रश्न सुटला नाही, तर
सर्व समाजबांधवांना सोबत घेऊन तीव्र
आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा
त्यांनी दिला आहे. समाजकारणाची 'वज्रमूठ'
शिवसेनेचे एकच धोरण... ८०%
समाजकारण आणि २०% राजकारण!
या ब्रीदवाक्यानुसार स्वप्निल जाधव
यांनी ही पावले उचलली आहेत. याप्रसंगी
त्यांच्यासोबत प्रमुख पदाधिकारी उपस्थित
होते:* प्रितम बालाजी जाधव (सर्कल
शाखा प्रमुख, वाढवणा बु* कृष्णा शिवाजी जाधव (सर्कल शाखा उपप्रमुख, वाढवणा बु)
* आकाश बारसकर (उदगीर) * मंगेश मेरकंडे (उदगीर) प्रशासनाने ही निवेदने स्वीकारली
असून, आता पोलीस आणि महसूल विभाग
यावर किती वेगाने कारवाई करतो, याकडे
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.