उदगीरमध्ये संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त अभिवादन
February 23, 2026
उदगीर प्रतिनिधी
उदगीर येथे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नूतन जिल्हा परिषद सदस्य डॉ. दीपक सोमवंशी यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी बोलताना डॉ. दीपक सोमवंशी यांनी संत गाडगेबाबा यांनी समाजप्रबोधन, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेल्या कार्याची आठवण करून दिली. समाजात स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांच्या विचारांचे आजही महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले. संत गाडगेबाबा यांचे जीवन हे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि लोकसेवेचे प्रतीक असल्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला राहुल गायकवाड, शंकर बोईनवाड यांसह स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी संत गाडगेबाबा यांच्या विचारांचे अनुसरण करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
जयंतीनिमित्त परिसरात स्वच्छता मोहीम व सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रम शांत व उत्साही वातावरणात पार पडला.

Social Plugin