दिल्ली येथे केंद्र सरकारच्या AI Summit कार्यक्रमादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांकडून झालेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ उदगीरमध्ये शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या आदेशानुसार आणि माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले.यावेळी राहुल गांधी यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
आंदोलनात श्रीमंत सोनाळे, शिवाजी भोळे, मुक्तेश्वर पाटील, अनिल पंचाक्षरी, बाबुराव आंबेगावे, लाखन कांबळे, शिल्पाताई इंगळे, अरुनाताई बेळकोने, नवज्योत शिंदे, अविनाश सूर्यवंशी, अनिल ढोबळे, अभंग मोटे, रघुनाथ केंद्रे, व्यंकट कसबे, शिवाजी कांबळे, पुंडलीक जाधव, अनिल कांबळे, नारायण नागरगोजे, मेघराज बिरादार, गोविंद बस्तापुरे, सोहम कन्द्रे, रवी गोरखे, प्रवीण सवारे, सतीश कसबे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
आंदोलन शांततेत पार पडल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Social Plugin