नायगाव ( बा .)
एज्युकेशन सोसायटी संचलित शरदचंद्र महाविद्यालय ग्रंथालय विभागाच्या वतीने तृतीय वर्षातील वाचकाला कै.सिताराम विठ्ठलराव लोकलवार यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट वाचक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . 2024 -25 मधील उत्कृष्ट पुरस्कार सौ .अनुराधा सुधाकर मृंदगे बी .कॉम . तृतीय वर्ष या वाचकाला वार्षिक स्नेहसंमेलनात प्राचार्य प्रो. डॉ . बलभीम वाघमारे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा . बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले . प्राचार्यांनी आपल्या भाषणात ज्ञान हीच खरी शक्ती आहे आणि वाचन हे त्या ज्ञानप्राप्ती चे प्रभावी साधन आहे . वाचकांमध्ये वाचनाची सवय दृढ व्हावी, ग्रंथालयाचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा आणि बौद्धिक विकासाला चालना मिळावी . यासाठी आमचे ग्रंथालय विविध उपक्रम राबवत असते . त्याचाच एक भाग म्हणून उत्कृष्ट वाचक पुरस्कार प्रदान करण्यात येतो असे मत व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा . बाबासाहेब शिंदे यांनी आजच्या डिजिटल युगात मोबाईल व सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे पुस्तक वाचनाची सवय कमी होत चालली आहे अशा परिस्थितीत वाचकांनी ग्रंथालयाशी घट्ट नाते जोडणे ही अत्यंत समाधानाची बाब आहे . या पुरस्काराच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा ग्रंथालयाचा प्रयत्न नक्की स्तुत्य आहे . असे मनोगत व्यक्त केले .
यावेळी ग्रंथपाल डॉ .बी .आर . लोकलवार यांनी प्रास्ताविकात हा पुरस्कार केवळ सन्मान नसून वाचक संस्कृती जपणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणेचा दीप आहे.भविष्यात अधिकाधिक वाचक या उपक्रमात सहभागी होतील आणि ज्ञानाचा प्रवाह अधिक समृद्ध करतील अशी अपेक्षा व्यक्त केली . या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर स्टॉफ सेक्रेटरी प्रो.डॉ .श्रीरंग वट्टमवार, आयक्यूएसी समयक डॉ .एम.एस . सिद्दिकी, नॅक समन्वयक प्रा.डॉ.शिवराज अंजनीकर, संमेलन प्रभारी प्रा.डॉ . गो.रा .परडे ,सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी प्रा.मनीषा पांगारकर, एनएसएस समन्वयक प्रा.मारुती कदम, प्रा.राजेश पाटील, शिक्षकेतर कर्मचारी श्री.महेश मोहिते उपस्थित होते.या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.साईनाथ वाघमारे यांनी केले,तर आभार प्रा.मनीषा पांगारकर यांनी मांडले .यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

Social Plugin