Type Here to Get Search Results !

शीतल स्विमिंग पूलमध्ये १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; हे स्विमिंग पूल कीती बळी घेणार. ?

उदगीर प्रतिनिधी
उदगीर ग्रामीण भागातील रिंग रोड परिसरातील शीतल जलतरण तलावात १६ वर्षीय कृष्णा कदम या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात व ग्रामीण भागात  मोठी खळबळ उडाली असून, जलतरण तलावाच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा कदम हा आपल्या मित्रांसह पोहण्यासाठी शीतल स्विमिंग पूलमध्ये गेला होता. पोहत असताना तो अचानक पाण्यात बुडाला. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तातडीने त्याला उदगीर सामान्य रुग्णालयात येथे  नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विशेष म्हणजे, शीतल जलतरण तलावात यापूर्वीही सुधा आसे  प्रकारची घटना घडल्याचे समोर येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ही   वारगवार आसे घटना होत असून, तरीही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. त्यामुळे “हा स्विमिंग पूल अजून किती बळी घेणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. घटनेच्या वेळी प्रशिक्षित लाईफगार्ड उपस्थित होता का, सुरक्षा साधनांची योग्य व्यवस्था होती का, तसेच अल्पवयीन मुलांसाठी कोणते नियम पाळले जातात का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित स्विमिंग पूल तात्काळ बंद करून चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणी स्थानिक प्रशासन लक्ष देवून कठोर कारवाई करावी पालकातून मागनी होत आहे प्रशासनाने काळजीपूर्व  लक्ष घालून  कारवाई करावी आशी मागनी नगरीकातून होत आहे.  दर्म्यान, या घटनेने पुन्हा एकदा खाजगी जलतरण तलावांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, नियमांचे काटेकोर पालन आणि नियमित तपासणी आवश्यक असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.