उदगीर प्रतिनिधी:
उदगीर तालुक्यात अवैध दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात उधाण आले असून संबंधित यंत्रणेकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. बंदी आदेश लागू असतानाही स्वरूप बार तिवटग्याळ पाटीवर व इतर ठिकाणी खुलेआम दारू विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. नव्याने आलेल्या अधिकाऱ्याला फोन करून सुद्धा कारवाई करण्यास टाळाटाळ विशेष म्हणजे नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईऐवजी हप्तेवसुली केल्याचे गंभीर आरोप स्थानिकांकडून होत आहेत.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वारंवार तक्रारी व फोण करूनही केवळ आश्वासने दिली जातात; प्रत्यक्षात ठोस कारवाई होत नसल्याचा अनुभव आहे. काही ठिकाणी बंद असतानाही मागच्या दरवाजातून दारू विक्री होत असल्याचे सांगितले जाते. महिन्याच्या ठराविक तारखांना ‘हप्ते’ दिल्यानंतर संबंधित ठिकाणांवर कारवाई टाळली जाते, अशीही चर्चा आहे.
तालुक्यातील विविध भागांमध्ये संध्याकाळनंतर अवैध दारूची विक्री वाढत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. विशेषतः ग्रामीण भागात तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने पालकवर्ग चिंतेत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून आकस्मिक धाडी टाकाव्यात व अवैध दारू विक्रीला आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मागील काळामध्ये चाटे होते तवा अवैध्य दारूला उदगीरात होत आला नव्याने आलेल्या अधिकारी हप्ते घेऊन करू लागले चाळा
तालुक्यातील अवैध दारू विक्रीवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. प्रशासनाने या आरोपांची गंभीर दखल घेऊन पारदर्शक चौकशी करावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

Social Plugin