उदगीर येथे वाळू वाहतूक व्यवसाय करणाऱ्या वाहन मालकाने उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी केली आहे. संतोष बाबुराव केंद्रे (रा. आमदपुर, ता. अहमदपूर) यांनी दिलेल्या निवेदनानुसार, दिनांक 18 मार्च 2026 रोजी सकाळी 9:41 वाजता त्यांची टिप्पर (क्रमांक MH 55 C 8946) वैध रिचार्ज इनव्हॉईससह निघाली होते. निलंगा येथे ग्राहक संपर्क न झाल्याने वाहन दुपारी 12:30 वाजता तेथून परत उदगीरकडे आले आणि तेथे माल खाली करण्यात आला. संबंधित प्रकरणात कोणतीही बेकायदेशीर वाळू वाहतूक किंवा चोरी झालेली नसतानाही, उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी अभिजीत लोखंडे व महबूब सय्यद यांनी गाडी चालकाला जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेऊन वाहन ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर रात्री उशिरा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सतोष केंद्रे यांच्या मते, संबंधित वाहन पालम येथून निघाल्यानंतर अहमदपूर तहसीलदारांनी तपासणी करून वाहन सोडले होते. तसेच उदगीरमधील उदयगीरी कॉलेजसमोरही पोलिसांनी पावती तपासून वाहनाला पुढे जाण्याची परवानगी दिली होती. तरीही नंतर अचानक गुन्हा दाखल करण्यात आल्याने संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय, पोलिसांनी रिकाम्या वाहनावर गुन्हा दाखल करत गाडी चालकाला मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. 20 मार्च रोजी संबंधित वाहन मादलापूर ज्या ठिकाणी रिकामे करण्यात आले होते, त्या ठिकाणी दोन पोलिसांनी इतरत्रील वाळू भरून वजन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात दररोज मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक होत असताना अनेक वाहनांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही केंद्रे यांनी नमूद केले आहे. मात्र, काही प्रकरणांमध्ये निवडक कारवाई होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच दाखल गुन्हा रद्द करून न्याय द्यावा, अशी मागणी केंद्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे . कळवले आहे.

Social Plugin