Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला समता आणि न्यायाचा मार्ग दाखवून दिला : माजी मंत्री आ.संजय बनसोडे

उदगीरची ऐतिहासिक नगरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दुमदुमली
आपल्या सर्वांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अपार श्रध्दा आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपण सर्वजण आपल्या जीवनाची वाटचाल करत असतो. नात्याच्या पलीकडे जाऊन रयतेसाठी काम करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आपणा सर्वांचे दैवत आहेत. त्यामुळे महाराजांप्रती माझ्या मनात असणारी श्रद्धा ही शब्दात मांडता येणार नाही म्हणून मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळपास 25 पुतळे सुशोभीकरण करून उभारले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला समता आणि न्यायाचा मार्ग दाखवून दिला असल्याचे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी उदगीर शहरातील विद्यावर्धिनी हायस्कूल येथुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखाव्याची भव्य मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले व जिजाऊ बिग्रेडच्या वतीने बाळ शिवबाचा पाळणा व शालेय साहित्य, रक्तदान शिबीर आदी कार्यक्रमास आ.संजय बनसोडे यांनी उपस्थिती लावली होती.
ते उदगीर शहरात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, तहसीलदार राम बोरगावकर, नगराध्यक्षा स्वाती हुडे, उपनगराध्यक्षा शितल शिंदे, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर बिरादार, जि.प. सदस्या उषा कांबळे, तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील, धनाजी मुळे, नगरसेवक बाळासाहेब पाटोदे, नरसिंग शिंदे, पृथ्वीराज पाटील, विजय निटुरे, शिवकुमार कांबळे,  प्रा.श्याम डावळे, मधुमती कनशेट्टे, उर्मिला वाघमारे, अॅड.वर्षा कांबळे, वैशाली कांबळे, व्यंकट बोईनवाड, राष्ट्रवादीचे   कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश बिरादार, कमलाकर फुले, अनिता जगताप, सतिश पाटील माणकीकर, डी.एस. बिरादार, अंकुश ताटपल्ले, लक्ष्मी भोसले, प्रीती भोसले, गोकर्णा गायकवाड, मनकर्णा मुदाळे,जिजाऊ ब्रिगेडच्या अनिता जाधव, पुष्पाताई जाधव, अनिता जगताप, प्रतिभा मुळे, नीता मोरे, अनिता भोसले, इंदुताई जाधव, सुरेखा भांगे, चारुशीला पाटील, शुभांगी आलट, अनिता बिरादार, महादेवी भोसले, छाया चव्हाण आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृहासाठी 22 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. नळेगाव रोडवर कोट्यावधी रुपये खर्च करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ऐतिहासिक भव्य - दिव्य महाप्रवेशद्वार उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे ते काम लवकरच पुर्ण होईल असे सांगितले.यावेळी उदगीर शहर व परिसरातील नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.