Type Here to Get Search Results !

शिवसेनेच्या वतीने ६३ लोकांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया आणि दृष्टीदान शिबिर


 शिवसेना पक्षाचे सचिव श्री संजय मोरे यांच्या ६३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना उदगीर (लातूर ग्रामीण) च्या वतीने समाज उपयोगी शिबिर आयोजित करण्यात आले. मौजे मोघा, ता. उदगीर येथे १६८ नागरिकांची तपासणी करून ६३ रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून दृष्टीदान देण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन मा. आमदार सुधाकर भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराचे आयोजन चंद्रकांत टेंगेटोल, जिल्हाप्रमुख लातूर ग्रामीण, डॉ. सागर समगे, डॉ. महेश समगे, डॉ. प्रशांत गायक, अनिल पंचाक्षरी (शहरप्रमुख उदगीर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिराचे संयोजन शिवाजी बिरादार यांनी केले.यावेळी गावचे सरपंच प्रमोद काळोजी, संदीप कुलकर्णी, अभंग बिरादार, प्रदीप पाटील, विनोद सुतार, संतोष श्रीमंगले, नागनाथ बिरादार, लखन कांबळे, व्यंकट कसबे, दिलीप पाटील, सुजर लिंगोजी, बालाजी पाटील, रजनीकांत दहीकांबळे, सुभाष बिरादार, किशोर कबाडे, ज्ञानेश्वर रोडगे, सूरज नराचे, रामेश्वर सूर्यवंशी, शिवदास विरकपाळे, मारुती गायकवाड, मारोती साळुंखे, धनराज सूर्यवंशी, मनोहर सुतार, बळंवन्त हणकुने, मुद्रिकाबाई कबाडे, ललिताबाई सूर्यवंशी, अभंग रुमने, बाबुराव लिंगोजी, अरुणाबाई लिंगोजी, अनुशाबाई जमादार, विश्वनाथ हंगरगे, गेंदाबाई कांबळे, ज्योती कांबळे, जयश्री कांबळे, संताबाई मेहत्रे, वैजनाथ सूर्यवंशी, रामभाऊ जेजुरे, उत्तम रोडगे, सुदाम गायकवाड, कलुबाई सूर्यवंशी, लक्ष्मण औडोबा, प्रल्हाद जेजुरे, वंदाबाई लिंगोजी, शानुरबी शेख, शबाना शेख, महमूद शेख, नारसिंग कांबळे, निर्मला कळोजी, चंद्रकला येगाडे, वच्छेला मालूले, प्रभू मलूले आणि अन्य रुग्ण व गावकरी नागरिक उपस्थित होते.
या शिबिरामुळे स्थानिक नागरिकांना दृष्टीदान होऊन त्यांचे जीवन अधिक सोपे आणि उजळ झाले आहे. शिवसेनेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे