वॉर्ड निहाय स्वच्छता मोहीम: उदगीर नगरपरिषदचा 100 दिवसांचा कार्यक्रम सुरू
February 24, 2026
उदगीर प्रतिनिधी
उदगीर नगरपरिषदेने वॉर्ड निहाय स्वच्छता मोहीमेची सुरुवात केली. या मोहिमेची शुरुआत संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त फुले नगर येथून करण्यात आली. नगराध्यक्ष,सौ. स्वातीताई सचिन हूडे, उपनगराध्यक्ष सौ.शितलताई नरसिंग शिंदे , स्वच्छता व आरोग्य सभापती, राजकुमार संग्राम हूडगे ,मुख्यधिकारी सोमनाथ जाधव,आणि सर्व नगरसेवक सचिन हुडे , डॉ. कोठारे, नससिंग शिंदे, मनोज पूदाले, सुधीर भोसले, गणेश गायकवाड, शेशिकांत बनसोडे, धीरज कसबे यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची शरूवात झाली.संत गाडगे महाराजांच्या विचारांनुसार "स्वच्छता जिथे लक्ष्मी तिथे" या सूत्राचे पालन करत, शहरातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की, ते केवळ स्वतःचे घरच नाही, तर सार्वजनिक परिसर, रस्ते, आणि संपूर्ण शहर स्वच्छ ठेवावे. स्वच्छतेची या मोहिमेतील भूमिका महत्त्वपूर्ण आहे, कारण यामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारेल, रोगराई कमी होईल आणि वातावरणही शुद्ध राहील.
स्वच्छता अभियानाचा उद्देश एक स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध उदगीर निर्माण करणे आहे. यासाठी नगरपालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे. मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे आहे. त्याचप्रमाणे, स्वच्छतेमुळे हवा आणि पाणी प्रदूषणही कमी होईल, आणि सर्वांच्या जीवनमानात सुधारणा होईल.
स्वच्छता ही केवळ वैयक्तिक गोष्ट नसून सामूहिक दृष्टीकोनातून पाहता ती नागरिकांच्या समृद्धीसाठी महत्त्वाची आहे. या मोहिमेचा यशस्वी परिणाम सर्वांच्या एकत्रित सहभागावर अवलंबून आहे.

Social Plugin