उदगीर प्रतिनिधी
मलकापूर शहरालगत असलेल्या नवीन वसाहत, एसटी कॉलनी, नळेगाव रोड येथील डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज चौक परिसरात महेश भैया मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासून परिसरात देशभक्तीपर घोषणांनी आणि सजावटीमुळे उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी अक्षनंद शाळेच्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांना महेश भैया मित्र मंडळाकडून पिण्याच्या पाण्याचे वाटप तसेच बिस्किटांचे वितरण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने विद्यार्थ्यांच्या सुविधेला प्राधान्य दिल्याचे यावेळी दिसून आले.
कार्यक्रमास मलकापूरचे सरपंच गुरुनाथा अण्णा बिरादार, लातूर जिल्हा परिषद सदस्य मुकेश भालेराव यांच्यासह विजयकुमार कापडे, राजकुमार पटणे, राजकुमार गोरे, साहेबराव कापडे, पद्माकर दंडीमे, गिरीश पवार, अजय तोटकर, कृष्णा साखरे, विजय तोटकर, बारसंगे सर, वैजनाथ बदनाळे आणि प्रशांत सोनकांबळे आदी उपस्थित होते.
शिवजयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून युवकांनी एकात्मतेचा संदेश दिला. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला.

Social Plugin