इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे
कळंब येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील कला शाखेतील विद्यार्थी राष्ट्रीय सायकलपटू कुमार हरीश दीपक डोंबाळे याची गुरुनानक देव विद्यापीठ अमृतसर पंजाब येथे संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सायकलिंग ट्रॅक इव्हेंट स्पर्धेकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघामध्ये निवड झाली आहे. नुकत्याच महाळुंगे पुणे येथे आंतर विभागीय स्पर्धा संपन्न झाल्या. तेथील विजयी कामगिरीमुळे त्याची विद्यापीठ संघामध्ये निवड झाली. हा संघ पुणे येथून स्पर्धेकरिता 17 फेब्रुवारी रोजी पुणे येथून रवाना होत आहे.
हरीश हा श्री शिवछत्रपती स्टेडियम महाळुंगे पुणे येथे या खेळाचा सराव करीत आहे. यापूर्वी शालेय स्तरावर देखील या खेळाडूंने अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. हरीश कडे असलेल्या उच्च दर्जाच्या कौशल्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडीबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमती आनंदी काकी रणसिंग, उपाध्यक्ष श्री प्रकाशबापू कदम, सचिव श्री विरसिंह रणसिंग, खजिनदार सौ. वर्षा पाटील यांनी खेळाडूचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच पुढील कामगिरी करिता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री शंकरराव रणसिंग, श्री कुलदीप हेगडे, सौ. राही रणसिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक काळंगे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे, श्री ज्ञानेश्वर गुळीग, श्री. दीपक डोंबाळे, महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
या खेळाडूस महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. सुहास भैरट व प्रशिक्षक दीपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Social Plugin