Type Here to Get Search Results !

उदगीर पालिका प्रशासनाच्या विरोधात युवक काँग्रेस ने केले बोंबाबोंब आंदोलन



उदगीर/ प्रतिनिधी
उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनमानी कारभार करीत प्रशासनाच्या काळात मोठ्याप्रमाणात लुट केले. आता लोकप्रतिनिधी पालिकेत असतानाही त्यांची मनमानी सुरूच आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 3.80 कोटीचे संयुक्त टेंडर काढण्याचे आदेश दिले होते. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आलेली कामे मनमानी पध्दतीने करीत असल्यामुळे तसेच यातील बरीच कामे यापूर्वीच पुर्ण झालेली असल्याने सदर कामांचा निधी त्वरीत रद्द करावे. यासाठी युवक काँग्रेस च्यावतीने पालिका कार्यालयात ठिय्या व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. दि. 4 मार्च पर्यंत सदर कामे स्थगित झाली नसल्यास पालिकेला टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार आहे.
उदगीर नगर पालिकेला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेंतर्गत अंतर्गत शहरातील विविध भागामध्ये सी.सी. रोड, आर. सी. सी. नाली, पेव्हर ब्लॉक, सुशोभीकरण, सभागृह बांधकाम व इतर 3.80 कोटीची काममचे संयुक्त टेंडर काढून करणे असे जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना देखील मुख्याधिकारी जाधव यांनी मनमानी कारभार करीत टेंडर रद्द केले. व मर्जीतील लोकांना खिरापत वाटल्यासारखे वाटत आहेत. विशेष म्हणजे यातील बरीच कामे यापूर्वीच पुर्ण झाली आहेत. अस असतांनाही झालेल्या कामाचा निधी आपल्या मर्जीतील व्यक्तीच्या माध्यमातून वळवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेंतर्गत अंतर्गत 3.80 कोटीच्या निधीची उच्चस्तरीय चौकशी करावी व सदर कामे तात्काळ रद्द करावी यासाठी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आदर्श पिंपरे यांनी लेखी निवेदनाव्दारे केली आहे. मात्र मुख्याधिकारी हे या निवेदनाची दखल घेत नसल्यामुळे दि. 2 मार्च रोजी पालिका कार्यालयात ठिय्या व बोंबाबोंब आंदोलन करुन निषेध नोंदविला असुन दि. 4 मार्चपर्यंत कामांना स्थगित न दिल्यास पालिकेस टाळे ठोकून आंदोलन करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष आदर्श पिंपरे यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनात ..... आदींचा सहभाग होता.