उदगीर प्रतिनिधी
उदगीर शहरातील जय जवान चौक परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारात एका अनोळखी पुरुषाचे प्रेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भगार दुकानाजवळ हा मृतदेह आढळून आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिली.घटनास्थळी तात्काळ उदगीर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. प्राथमिक तपासात मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 ते 50 वर्षे असल्याचे समोर आले आहे. मात्र सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाची पाहणी करून पुढील तपासासाठी आवश्यक प्रक्रिया पोलीसांकडून सुरू करण्यात आली आहे.सदर घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.दरम्यान, या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी उदगीर शहर पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. सुमारे 45 ते 50 वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचे प्रेत जय जवान चौकातील भगार दुकानाजवळ आढळले असून, जर ही व्यक्ती कोणाच्या ओळखीची असेल तर तात्काळ उदगीर शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी सांगितले आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी किंवा ओळख पटविण्यासाठी पोलीस निरक्षक दिलीप गाडे (मो. 8888879969) पोलीस उपनिरीक्षक काळे (मो. 9850072078) पोलीस कर्मचारी डी. यू. हर्णे (मो. 8329345269), यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Social Plugin