Type Here to Get Search Results !

देशाचे उज्वल भविष्य घडविण्याचे काम शाळेतून होते : सौ.शिल्पा बनसोडे

देशाचे उज्वल भविष्य घडविण्याचे काम शाळेतूनच सुरू होते. मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी प्रथम आई-वडिलांची असली तरी त्या संस्कारांना योग्य दिशा देण्याचे कार्य शाळेतील शिक्षक करत असतात. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे तर संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि समाजात चांगला नागरिक बनण्याचे धडे शाळेतून मिळतात. त्यामुळे शाळा ही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी आणि त्यांना यशाच्या मार्गावर नेणारी पवित्र संस्था असल्याचे मत सौ.शिल्पा संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
त्या उदगीर शहरातील लाॅर्ड बस्वेश्वरा प्री - प्रायमरी स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी बोलत होत्या.
या कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. स्वाती हुडे, उपनगराध्यक्षा सौ. शितल शिंदे, ह.भ.प. उद्धव महाराज हैबतपुरे, नगरसेविका गंगाबाई कपाळे, नागेश आष्टुरे, शाळेच्या संचालिका अनिता हैबतपुरे, शिवानंद हैबतपुरे, अमोल निडवदे, मनोज कपाळे, कल्पना चौधरी, ओमप्रकाश झुरळे, शिवराज पाटील, धनराज बिरादार, गणेश चितोडे, श्याम शिंदे, प्रतिभा मुळे, रविकिरण फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्याविष्कार, लघुनाटिका आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे प्रेक्षकांची वाहवा मिळवली. लहानग्या विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थित पालकांनीही टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना प्रोत्साहन दिले.
शहरातील लॉर्ड बसवेश्वरा प्री-प्रायमरी स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी, शिक्षक तसेच मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गीते, नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या संचालिका अनिता हैबतपुरे, शिवानंद हैबतपुरे तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले.