Type Here to Get Search Results !

​ग्राहकांची हेळसांड: घरगुती गॅसची साठेबाजी करून चढ्या दराने विक्री होत असल्याची चर्चा ​


उदगीर प्रतिनिधी
राज्यात गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे खुद्द मुख्यमंत्री सांगत असताना आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घरगुती गॅस वितरण सुरळीत करण्याचे आदेश दिले असतानाही, उदगीर येथील मनोज गॅस एजन्सी' आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला आहे. ग्राहकांनी वारंवार बुकिंग करूनही त्यांना वेळेवर गॅस मिळत नसल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. ​बुकिंग असूनही १५-२० दिवसांची प्रतीक्षा उदगीर तालुक्यातील अनेक ग्राहक गॅस बुकिंगसाठी एजन्सीकडे चकरा मारत आहेत. "बुकिंग झाले आहे, पण गॅस १५ ते २० दिवसांनी मिळेल," असे उत्तर देऊन ग्राहकांना माघारी धाडले जात आहे. प्रत्यक्षात नियमानुसार गॅस वितरण वेळेत होणे बंधनकारक असताना, ही एजन्सी जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. ​साठेबाजी आणि काळ्या बाजाराची चर्चा शहरात अशी चर्चा आहे की, घरगुती ग्राहकांचा गॅस अडवून ठेवून त्याची साठेबाजी केली जात आहे. हाच गॅस हॉटेल चालकांना चढ्या दराने (ब्लॅक मार्केटमध्ये) विकला जात असल्याचे बोलले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घरगुती गॅस पुरवठा विनाव्यत्यय सुरू ठेवण्याचे आवाहन केले असले तरी, मनोज गॅस एजन्सीचे मालक या आवाहनाला जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे. ​प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील नियोजन कोलमडले आहे. या गंभीर प्रकाराकडे पुरवठा विभागाने आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन एजन्सीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी उदगीरच्या नागरिकांकडून होत आहे. ​