उदगीर प्रतिनिधी
उदगीर शहरामध्ये शिवा संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराज जयंती साजरी करण्यात आली. शिवा संघटनेची उदगीर शाखा व तालुका शाखेच्या वतीने या जयंतीचे नियोजन करण्यात आले होते. या जयंतीच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन मंत्री दीपक जी गायकवाड विश्व हिंदू परिषदेचे नैतिक मूल्य शिक्षण प्रमुख संतोष जी कुलकर्णी शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे
विश्व हिंदू परिषदेचे भगवानजी राठोड, उदगीरचे नगरसेवक मनोज दादा पुदाले माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, डॉक्टर विजयकुमार जी बिराजदार शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जी टिंगेटोल, श्रीराम प्रतिष्ठानचे सतीश पाटील, ह भ प उद्धव महाराज हैबतपुरे, श्रीपाद करंजीकर, महामुनी जी,उदगीर तालुक्याचे शिवा संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर जी कदम, उदगीर शहर अध्यक्ष शिवा संघटना डॉक्टर रवी मुळे, अजय तोडकर ,जिल्हा कर्मचारी आघाडीचे प्रमुख अमरजी पटवारी, उदगीर शहर कार्यकारणी सदस्य राजेश शेटकार प्रशांत ममदापूर, गजानन राजुरे राष्ट्रीय समाज पक्षाचे नागनाथ बोडके, टायगर सेनेचे जॉकी सावंत, सावंन टँकसाळे, अरविंद शिंदे आदीसह शेकडो समाजबांधव जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आले होते
सर्व मान्यवरांनी आपल्या संघटनेच्या वतीने व पक्षाच्यावतीने महात्मा बसवेश्वर जयंती च्या पावन मुहूर्तावर समाजातील सध्याची स्थिती व महात्मा बसवन्नाच्या विचारांची समाजाला गरज यावर आपलं मत मांडले. शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे बोलताना म्हणाले की, महात्मा बसवण्याची विचार अनुभव मंडपाच्या माध्यमातून शिवा संघटना येणाऱ्या काळामध्ये जिल्हाभर समतेचा विचार घेऊन जाईल. त्याचबरोबर बसकल्याण येथील अल्फा मंडपाची जागा नवाब च्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी शिवा संघटनेचे राष्ट्रीय तथा संस्थापक अध्यक्ष मनोहर जी धोंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे भव्य वीरशैव लिंगायत समाजाचे आंदोलन होणार असल्याची माहिती दिली अध्यक्षीय समारोप करताना विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन मंत्री दीपक जी गायकवाड यांनी महात्मा बसवन्नाची जगाला असलेली गरज व्यक्त केली केवळ लिंगायत बांधवांसाठी नव्हे तर संबंध भारतातील जनतेसाठी महात्मा बसवन्नाचे विचार हे पंथप्रदर्शक आहेत असा विचार त्यांनी यावेळी मांडला
आभार प्रदर्शन शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास खिंड यांनी केले. आभार प्रदर्शनामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणाले की, शिवा संघटना वीरशैव लिंगायत बांधवांच्या सर्व प्रकारच्या समस्येला उत्तर म्हणून तुमच्या सोबत आहे त्याचबरोबर समाजातील वंचित पीडित, मागास,शोषित अशा सर्व जातीपातीतील समाजाच्या समस्येमध्ये शिवा संघटना कायम पुढाकार तीस वर्षापासून घेत आहे आणि पुढेही घेत राहील असा विश्वास त्यांनी आपल्या आभार प्रदर्शनातून दिला. शिवा संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराज जयंती साजरी करण्याचे हे पहिलं वर्ष आहे. प्रत्येक वर्षी शिवा संघटना उदगीर मध्ये महात्मा बसेश्वर महाराज जयंतीच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्षांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्व बसव भक्तांसाठी थंडगार अशा मठ्ठ्याची व्यवस्था केली होती 2000 पेक्षा जास्त लोकांनी मठ्ठा रुपी हा प्रसाद ग्रहण केला.
अशा गरिमामय वातावरणामध्ये या जयंती महोत्सवाचा समारोप झाला.

Social Plugin