उदगीर / प्रतिनिधी
उदगीर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध मटक्याचा धंदा जोरात सुरू असून, यामुळे सर्वसामान्यांचे आणि विशेषतः गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत आहेत. शहरात ठिकठिकाणी मटक्याची दुकाने उघडपणे थाटली जात असून, स्थानिक पोलिसांच्या आशिर्वादामुळेच हे अवैध व्यवसाय फोफावत असल्याचा खळबळ नागरिक करत आहेत. उदगीर शहरात मटक्याचा विळखा इतका घट्ट झाला आहे की, तरुणांपासून ते मजुरांपर्यंत अनेकजण या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, जिल्हा पोलीस अधीक्षकांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने, अनेकदा पोलीस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने उदगीरमध्ये येऊन कारवाई करावी लागते. मात्र, आयजींच्या पथकाने कारवाई केल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा 'जैसे थे' परिस्थिती निर्माण होते. हप्तेखोरीच्या चर्चेला उधाण उदगीर शहर पोलीस दलातील काही अधिकारी केवळ हप्ते गोळा करण्यात मग्न असून, कारवाई करण्याऐवजी या अवैध धंद्यांना खतपाणी घालत असल्याची चर्चा शहरभर आहे. "शहर पोलीस अधिकाऱ्यांना पैश्याचा चटका मुळे करीत आहे अवैध्य मटक्या चा खुले अम धंदा मात्र गोरगरिबांना सोसावा लागत आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे.तातडीच्या कारवाईची मागणी स्थानिक पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा फेल ठरत असल्याने, आता पोलीस महानिरीक्षकांनीच या प्रकरणात वैयक्तिक लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. उदगीर शहरात हावगीस्वामी मठ परिसरात अवैध मटक्याचे दुकान थाटात सुरू आहे तात्काळ बंद करून संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करावी, अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांनी करीत आहे.

Social Plugin