Type Here to Get Search Results !

देवणी येथे माहात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त वंचित बहुजन माथाडी युनियनतर्फे अभिवादन पाणी वाटप


​देवणी प्रतिनिधी
महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून देवणी येथे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीने अभिवादन व जनसेवेचा उपक्रम राबवण्यात आला. जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीच्या मार्गावर, बस स्थानकासमोर युनियनच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. ​कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता, मिरवणुकीत सहभागी झालेल्या शिवभक्तांसाठी आणि नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. युनियनच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.​प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आयुब कुरेशी आणि बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे तालुकाध्यक्ष अटल धनुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबतच राजूभाऊ नरगळे, संतोषभाऊ स्वामी, चंद्रकांतभाऊ तोगरगे यांसह वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.​अतिशय उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमातून सामाजिक सलोखा आणि सेवाभावाचा संदेश देण्यात आला. मिरवणुकीतील नागरिकांनीही या उपक्रमाचा लाभ घेत युनियनचे आभार मानले.