उदगीर | प्रतिनिधी
महात्मा बसवेश्वर महाराज जयंती २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवा संघटनेची जिल्हास्तरीय नियोजन बैठक शुक्रवार, १० एप्रिल रोजी नाईक चौक येथील जिल्हा संपर्क कार्यालयात पार पडली. या बैठकीत जयंतीचा भव्य उत्सव साजरा करण्यासह बसवकल्याण येथील ‘अनुभव मंडप’ नवाबाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आंदोलन उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे होते. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. विलास खिंडे यांनी संघटनेच्या कार्यपद्धतीचा आढावा घेताना सांगितले की, महात्मा बसवेश्वर जयंती राष्ट्रीय स्तरावर साजरी करण्यासाठी संघटना कटीबद्ध आहे. या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यासह सर्व शासकीय कार्यालये आणि शिक्षण संस्थांमध्ये जयंती साजरी व्हावी, यासाठी संघटना आक्रमक पाठपुरावा करेल. तसेच, गेल्या ३० वर्षांपासून संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवा संघटना समाजाच्या हक्कासाठी सातत्याने लढा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जयंती उत्सवाची व्याप्तीउदगीर शहरात सार्वजनिक महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीमार्फत जयंतीचे नियोजन सुरू असून, त्यात शिवा संघटना पूर्ण ताकदीने सहभागी होईल. जयंतीनिमित्त शहरात मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.शिरूर अनंतपाळ येथे चिंतन मेळावायेत्या २२ एप्रिल २०२६ रोजी शिरूर अनंतपाळ येथे वीरशैव लिंगायत समाजाचा भव्य चिंतन मेळावा आणि नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार समारंभ होणार आहे. या मेळाव्यास उदगीर तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.दिग्गजांची उपस्थितीया बैठकीस कर्नाटक राज्य कार्यकारिणी सदस्य रितेश घाळे, जिल्हा प्रवक्ते सुभाष आप्पा बिराजदार, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन मंगनाळे, रतिकांत आप्पा स्वामी (धार्मिक आघाडी), अमर पटवारी (कर्मचारी आघाडी), अंतेश्वर तोडकरी (व्यापारी आघाडी), जिल्हा मार्गदर्शक बालकुंदे सर, तालुकाध्यक्ष रामेश्वर कदम, शहराध्यक्ष डॉ. रवी मुळे यांच्यासह ग्रामीण व शहरी भागातील मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Social Plugin