निडेबन जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – डॉ. दीपक सोमवंशी यांचे आवाहन
January 25, 2026
निडेबन जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. दीपक सोमवंशी यांनी निडेबन गटातील सर्व नागरिकांना येत्या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. निडेबन येथे आज सायंकाळी ठिक ७:१५ वाजता ही भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा डॉ. दीपक सोमवंशी यांच्या प्रचारार्थ होत असून, या सभेला महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.या जाहीर सभेला माजी मंत्री आमदार संजय बनसोडे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, ते नागरिकांना संबोधित करणार आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, निडेबन गटातील विकासाचा आराखडा, स्थानिक प्रश्न, यासंदर्भातील ठोस भूमिका या सभेत मांडली जाणार आहे.डॉ. दीपक सोमवंशी यांनी सांगितले की, निडेबन गटातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आपण नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व मिळाल्यास विकासाला गती देण्याचे काम प्राधान्याने केले जाईल. यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि पाठिंबा अत्यंत गरजेचा आहे.या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच निडेबन जिल्हा परिषद गटातील सर्व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. दीपक सोमवंशी यांनी केले आहे. ही सभा परिवर्तनाचा संदेश देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Social Plugin