Type Here to Get Search Results !

मादलापूर येथे डॉ. दिपक सोमवंशी व विमलताई चिखले यांचा जोरदार बैठका जनसंपर्क

उदगीर/  प्रतिनिधी : 
निडेबन जिल्हा परिषद गटातील अधिकृत उमेदवार डॉ. दिपक सोमवंशी तसेच पंचायत समिती गणातील अधिकृत उमेदवार विमलताई चिखले यांनी मादलापूर येथे नागरीकाच्या बैठका व घरभेटी घेतल्या. या बैठकीत मतदारांशी थेट संवाद साधत विकासकामांचा आढावा घेण्यात आला तसेच पुढील काळातील प्राधान्यक्रम स्पष्ट करण्यात आला.मादलापूर येथील विविध वस्ती व प्रगतीनगर भागात झालेल्या बैठकीत स्थानिक नागरिकांनी त्यांच्या अडचणी मांडल्या असता उमेदवारांनी त्या ऐकून घेऊन टप्प्याटप्प्याने सोडवण्याचे आश्वासन दिले. “लोकप्रतिनिधी थेट जनतेत उतरला पाहिजे, केवळ निवडणुकीपुरता नव्हे तर कायमस्वरूपी संवाद हवा,” असे मत डॉ. दिपक सोमवंशी यांनी यावेळी व्यक्त केले.मनोजभाऊ चिखले यांनी महिलांच्या प्रश्नांवर विशेष भर दिला. महिला बचतगटांना आर्थिक पाठबळ, आरोग्य तपासण्या, मुलींच्या शिक्षणासाठी सुविधा आणि अंगणवाडी बळकटीकरण या मुद्द्यांवर त्यांनी ठोस भूमिका मांडली. “महिलांचा सहभाग वाढला तरच गावाचा सर्वांगीण विकास होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.या बैठकींना उपसरपंच डॉ. दत्ता पाटील, मारोती मादलापुरे, शिवाजी शिंदे, राजकुमार गायकवाड, कमलकिशोर कांबळे, प्रगतीनगर येथील रामेश्वर नुत्ते सावकार, शिवराम कांबळे, शिवाजी कटदे, रविंद्र रोठ्ठे, सुरज घाळे, भारत बुय्या, अनिल जाधव, घोणेनिडेबांचे माजी सरपंच सुनील सोमवंशी, ग्रामपंचायत सदस्य दशरथ शिंदे, राष्ट्रवादीचे युवा नेते अविनाश गायकवाड, प्रेम गायकवाड, शिवा पकोळे, पॅंथर नेते गौतम सोमवंशी, शशिकांत सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते मादलापूर परिसरात या नागरीकांच्या बैठकींमुळे प्रचाराला चांगलीच गती मिळाली असून स्थानिक पातळीवर सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. नागरिकांच्या सहभागातून विकासाचा अजेंडा पुढे नेण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.