Type Here to Get Search Results !

“निडेबन गटात डॉ. दीपक सोमवंशी यांच्या प्रचाराला गती; संजय बनसोडेंकडून गावविकासाचे आश्वासन”


उदगीर / प्रतिनिधी
निडेबन जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकृत उमेदवार डॉ. दीपक सोमवंशी आणि सुनीता राठोड यांच्या प्रचाराला वेग आला असून, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत विविध गावांत प्रचारसभा घेण्यात आल्या. या सभांमधून विकास, पाणीप्रश्न आणि मूलभूत सुविधांचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला.
बॉर्डर तांडा येथे झालेल्या जाहीर सभेत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी गावकऱ्यांना पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे ठाम आश्वासन दिले. “गावाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय असून, पाणी, रस्ते, वीज, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी एकसंघपणे काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.या प्रचार दौऱ्यात गायमाळ तांडा, मचा तांडा, रामघाट तांडा, बॉर्डर तांडा, लिमगाव, चाडेगाव , शिरूळ , चानापूर '  कौळखेड . तसेच परिसरातील इतर गावांमध्ये जाहीर सभा घेण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या असून, त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात आले. विशेषतः पिण्याच्या पाण्याची टंचाई, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आणि शासकीय योजनांचा लाभ वेळेवर न मिळण्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.डॉ. दीपक सोमवंशी यांनी जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून विकास निधीचा योग्य वापर करून प्रत्येक गावापर्यंत योजना पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. तर पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुनीता राठोड यांनी महिलांसाठी रोजगार, स्वयं-सहायता गटांना बळकटी, तसेच आरोग्य व शिक्षण सुविधांवर विशेष लक्ष दिले जाईल, असे सांगितले.
या सभांना माजी नगराध्यक्ष राजेश्वरराव निटूरे, विनायक आडे, रामराव राठोड, सजित कांबळे, सुनील सोमवंशी, सुर्दशन पाटील, सुनिल आडे, बालाजी पप्पू पाटील गुरधारळकर रजित कांबळे  तसेच विविध गावांचे सरपंच व चेअरमन , पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.एकूणच निडेबन गटात निवडणुकीची रंगत वाढली असून, विकास आणि स्थानिक प्रश्नांच्या आधारे प्रचाराला वेग आला आहे. आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.