Type Here to Get Search Results !

माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष पं.स.सदस्या सौ.सुरेखा भांगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश


उदगीर प्रतिनिधी
उदगीर : माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विकासावर विश्वास ठेवून उदगीर पंचायत समिती वाढवणा गणातून निवडुन आलेल्या अपक्ष उमेदवार सौ.सुरेखा सर्जेराव भांगे पाटील व त्यांच्या शेकडो कार्यकर्तानी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.यावेळी आमदार संजय बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवुन वाढवणा गणाचा सर्वांगीण विकास करावा असे सांगितले.यावेळी हेर गटाचे जि.प.सदस्य प्रा.दिलीपकुमार मटके, निडेबन गटाचे जि.प. सदस्य डाॅ.दिपक संग्राम  सोमवंशी, तोगरी गटाचे जि.प. सदस्य ज्ञानेश्वर बिरादार, प्रकाश बिरादार, वनमाला मरलापल्ले, कमलाकर फुले,बापूसाहेब भोसले, काशीबाई सुर्यवंशी, सरमंगला बिरादार, प्रा.श्याम डावळे, सुधीर भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, कार्याध्यक्ष वसंत पाटील, सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे, अनिरुध्द गुरुडे, बाळासाहेब मरलापल्ले, धनाजी मुळे, प्रकाश राठोड, सुदर्शन पाटील, सर्जेराव भांगे, शुभम केंद्रे, अरविंद गिलचे, शुभम भुमणे रेड्डी, ज्ञानेश्वर भांगे, विदेश पाटील, महेश बिरादार, राजकुमार पाटील, नागेश थोंटे, प्रभाकर पाटील,  राहूल गायकवाड,   अनिताताई भोसले, शुभम केंद्रे, विदेश पाटील,गणपत पवार, पिंटु डावळे, बालाजी परकड, अरविंद बिरादार, अविनाश बेळकुंदे,  अनवर हवलदार, आदी उपस्थित होते.यावेळी आ.संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी उदगीर तालुक्यातील विविध गावचे सरपंच, चेअरमन व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.