उदगीर प्रतिनिधी
उदगीर शहरात विश्वरत्न, भारतरत्न प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सार्वजनिक जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येते. यावर्षीही भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी व नवीन कार्यकारणीची निवड करण्यासाठी शहरातील नालंदा बुद्ध विहारात देविदास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत सर्वानुमते राज्याचे माजी क्रीडा मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांची अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी शशिकांत बनसोडे, शिवकुमार कांबळे, धिरज कसबे, जवाहरलाल कांबळे, नरसिंग शिंदे, दिलीप सोनकांबळे, दयानंद शिंदे, आदीसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Social Plugin